शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी तरुणाचा जामिन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 16:28 IST

सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी तरुणाचा जामिन फेटाळला. या प्रकरणात आकाश वाघ (वय २२) याला अटक करण्यात आली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर अथर्व राजे (वय १८) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्दे ही घटना धनकवडी भागातील एका बंगल्यात ११ मार्च ते ५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत घडली. पोलिसांनी निखील आणि आकाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

पुणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी तरुणाचा जामिन फेटाळला. निखील श्रीकांत गोडसे पाटील (रा. नºहे) असे जामिन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात आकाश प्रशांत वाघ (वय २२, रा. दत्तनगर) याला अटक करण्यात आली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर अथर्व राहुल राजे (वय १८, रा. हिंगणे खुर्द) याच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. ही घटना धनकवडी भागातील एका बंगल्यात ११ मार्च ते ५ आॅगस्ट २०१७ या कालावधीत घडली. पीडित मुलगी ही अथर्व याची वर्ग मैत्रीण होती. अथर्व याने मामेभाऊ आकाश याला फिर्यादीच्या संपर्कात आणले. आकाश याने फिर्यादीला फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अथर्व याचा मामेभाऊ असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते. नंतर भेटणे सुरू झाले. दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबतची माहिती आकाश याने मित्र निखील याला दिली. त्यानंतर निखील याने पीडित मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्यानंतर तिचे आकाश सोबत असलेल्या संबंधाची माहिती आई-वडिलांना कळवण्याची आणि त्याच्याकडे तिचे अश्लील फोटो आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला अथर्व याच्या आजोबाच्या बंगल्यावर बोलावले. त्यावेळी अथर्व याच्या उपस्थितीत निखील आणि आकाश या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी फिर्यादी तेथून निघून गेली. त्यानंतर एका महिन्यांनी निखील आणि आकाश या दोघांनी शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी फिर्यादिला दिली. या प्रकारामुळे फिर्यादीने घरी जावून वेगवेगळ्या औषधांच्या गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर रुग्णालयात उपचार केल्यानंतर फिर्यादीच्या घरी ही घटना कळली. या प्रकरणात पोलिसांनी निखील आणि आकाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. निखील याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. निखील मुख्य आरोपी आहे. त्याने सामूहिक बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केला आहे. ज्याची कमीत कमी शिक्षा २० वर्षे आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाCourtन्यायालय